हरतालिका

गणेश चतुर्थींच्या आदल्या दिवशी म्हणजे भाद्रपद शुद्ध तृतियेला हरतालिका` असे म्हणतात. भाद्रपद महिन्यात शुक्ल पक्षाच्या तृतियेला हरतालिकेचं व्रत महिला करत असतात. अनेक राज्यांमध्ये याला तीज असंही म्हणतात. हे व्रत भगवान शंकराला आणि माता पार्वतीला समर्पित आहे. पौराणिक मान्यतेनुसार कुमारी कन्या हे व्रत चांगला मनासारखा पती मिळण्यासाठी करतात. तर लग्न झालेल्या महिला हे आपलं सौभाग्य अबाधित राहावं, यासाठी हरतालिकेचं व्रत करत असतात. हे व्रत करूनच माता पार्वतीनं आपला मनासारखा वर म्हणजेच भगवान शंकराची प्राप्ती केली होती.

या दिवशी मुली व सुवासिनींनी सुवासिक तेल लावून स्नान करावे. स्नान केल्यानंतर स्वच्छ केलेल्या जागेवर एका जागी चौरंग ठेवावे. रांगोली काढून व केळीच्या खांबांनी चारही बाजूंनी सुशोभित केलेल्या चौरंगावर वाळू आणून पार्वती आणि सखीसह शिवलिंग स्थापित करावे. उजव्या बाजूस तांदळाच्या एका ढिगावरील सुपारीवर किंवा नारळावर गणपती मांडावा. समोर पाच विडे मांडून तेथे सुपारी, खारीक, बदाम, नाणे, फळ ठेवावे.

सर्वप्रथम स्वत:ला हळद कुंकु लावून देवासमोर विडे ठेवावे. अक्षता, हळद कुंकु वाहून मनोभावे नमस्कार करावा. घरातील वडीलधार्‍या मंडळींना नमस्कार करून नंतर पूजा प्रारंभ करावी. पूजा करण्यापूर्वी दिव्यांची पूजाही करावी. सर्वप्रथम गपपतीची आणि नंतर महादेव व सखी-पार्वतीची षोडशोपचारे पूजा करावी. पूजेसाठी घेतलेले साहित्य विधीपूर्वक देवाला अर्पित करावे.

पूजा केल्यावर धूप-दीप, नैवेद्य दाखवून पत्री वाहावी. हरतालिकेच्या पूजेत जी पत्री वाहतात त्यांचे क्रम असे आहे: बेल, आघाडा , मधुमालती , दूर्वा , चाफा , कण्हेर , बोर , रुई , तुळस , आंबा , डाळिंब , धोतरा , जाई , मरवा , बकुळ, अशोकाची पाने वाहावी. नंतर मनोभावे प्रार्थना करावी. कुमारिकेने इच्छितत वर मिळविण्यासाठी तर सुवासिनीने अखंड सौभाग्य लाभू दे अशी प्रार्थना करावी. दिवसभर कडक उपोषण करावे. शक्य नसल्यास फलाहार करावा. या दिवशी आगीवर बनविलेला कोणताही पदार्थ खात नाहीत. नंतर रात्रभर झिम्मा, फुगडी, टिपऱ्या, गोफ इत्यादी खेळ खेळत जागरण करून हरतालिकेची कथा ऐकून, आरती करून बारानंतर रूईच्या पानावर दही घालून ते चाटावे. दुसर्‍या दिवशी उत्तरपूजा करून ती लिंगे विसर्जन करावी.

सामग्री यादी :
गणपती हळकुंड 5 नग
शंख खडीसाखर 20 ग्रॅम
घंटी सुके खोबरे 02 नग
हळद 25 ग्रॅम गुळ 100 ग्रॅम
कुंकू 25 ग्रॅम पंचखाद्य 100 ग्रॅम
गुलाल 25 ग्रॅम नारळ 3 नग
अभिर 25 ग्रॅम तांदुळ 02 किलो
अष्टगंध 25 ग्रॅम द्रोण 25 नग
चंदन पावडर 50 ग्रॅम पंचे 01 नग
रांगोळी 250 ग्रॅम धोतर पान 01 नग
गोमुत्र 01 बाटली ब्लाऊज पिस 02 नग
सुतगुंडी 01 नग विविध प्रकारची सुवासीक फुले ½ किलो
पंचरंगी धागा 01 नग सर्व प्रकारची पत्री 01 जुडी
अत्तर 01 बाटली बेल पत्र 20 नग
जानवी जोड 02 जोड तुळस 01 जुडी
माचिस 01 नग दुर्वा 01 जुडी
कापुर 25 ग्रॅम दुर्वांची कंठी 01 नग
कापसाचे वस्त्र 01 पाकीट फुलांचे हार 01 नग
तेल वाती 01 नग आंब्याचे डहाळे 02 नग
तुप वाती 01 नग फुलांचे तोरण 01 नग
तिळाचे तेल 01 लिटर विड्याची पाने 30 नग
गुलाब पाणी 01 बाटली फळे 05 नग ( 01 संच )
गंगाजळ 01 बाटली केळी 06 नग
अगरबत्ती 01 पुडा केळीचे खांब 04 नग
मोठ्या सुपार्‍या 25 नग शंकराच्या पिंडीसाठी रेती
बदाम 5 नग गाईचे तुप 100 ग्रॅम
खारिक 5 नग मध 01 बाटली
अक्रोड 5 नग चौरंग 01 नग
आसने 03 नग निरांजन ( तेलाचे व तुपाचे ) प्रत्येकी 01 नग
ताम्ह्न 03 नग पंचामृत 01 वाटी
तांब्याचे तांबे 02 नग सुट्टे पैसे 20 नाणी
पळी 01 नग पातेल 01 नग
भांडे ( पंचपात्री ) 01 नग कर्मानुसार मुख्यदेवता प्रतिमा अन्नपूर्णा मुर्ती
स्टिलची ताटे 02 नग नैवेद्य पेढे पाव किलो
समई 02 नग

टिप :-
  • चौरंग, पाट, आसने, ताम्ह्न, तांब्याचे तांबे, पळी, भांडे ( पंचपात्री ), स्टिलची ताटे, वाटी चमचे, पातेल, इत्यादि वस्तूंची व्यवस्था यजमानांना करावी लागेल अन्यथा गुरुजीन कडून भाडे तत्वावर पुरवले जाईल.
  • घरातील देव, फोटो, गोडाचा शीरा किवा पेढ़े, समई, निरांजन, तेल, तूप ही व्यवस्था यजमानाने करावी.
ठिकाण आणि दक्षिणा:
गुरुजी संख्या – 1

ठिकाण दक्षिणा
डोंबिवली 2500/-
ठाणे ते दादर 2500/-
पनवेल 2500/-
नवी मुंबई 2500/-
वेस्टर्न 2500/-
टिटवाळा ते कसारा 2500/-
बदलापूर ते कर्जत 2500/-
सामग्री (गुरुजींच्या दक्षिणे व्यतिरिक्त) 600/-

पूजा बुक करा