दशक्रिया विधी

दशक्रिया हा हिंदू चालीरीतींनुसार व्यक्तीच्या मृत्यूनंतर दहाव्या दिवशी करण्यात येणारा विधी आहे. हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे मृत्युनंतर दहा दिवस आत्मा पृथ्वीतलावर वास करतो. दहावा विधी केल्यानंतर त्याच्या इच्छा तृप्त न झाल्यास त्याला मुक्ति मिळत नाही. इच्छा राहिल्या नसल्यास दहाव्याच्या भाताच्या पिंडाला कावळा शिवल्यास मुक्ति मिळते, कारण कावळ्याच्या रूपात आत्मा असतो अशी धारणा आहे. परंतु कधीकधी कावळा शिवत नाही अशा वेळेस ब्राह्मण दर्भाचा कावळा स्पर्श पिंडाला करून कावळा शिवला असे मानतात.

सामग्री यादी :
हळद ५ ध्वज
कुंकू ५ उदकुंभ
अबिर १ केळीच पान
पांढरी गंधगोळी  पांढरी फुले
काळेतिळ तुळशी
जव किंवा तांदूळ भृगराज पत्र
 ताम्हण ३  माती १ किलो
भांड  तांब्या १
भाताचे पिंड १० लहान व ५ मोठे पळी
गव्हाच्या पिठाचे ८ पिंड व ५ छत्र १० पादुका तसेच ५ पोलीका

पुरोहितांच्‍या सन्‍मतीने सामुग्रीची व्यवस्था करावी.

दशक्रिया विधी

विधी बुक करा