
सोड मूंज
समावर्तन म्हणजेच विद्यार्जन संपवून स्वगृही परत येणे. म्हणजेच ब्रह्मचर्यव्रताची निवृत्ती होय. पूर्वीच्या काळी वेदाध्ययन पूर्ण झाल्यानंतर गुरुगृहीच, घरी परतण्याच्या आधी संस्कार केला जात असे. यामधे कंबरेतील करगोटा काढून टाकतात म्हणून याला ‘सोडमुंज‘ असेही संबोधले जाते. समावर्तनानंतर विवाहापर्यंतच्या कालावधीत मुलाची गणना ‘स्नातक‘ म्हणून केली जाते . तसेच स्नाताकाने ब्रह्मचर्याश्रम व पुढे विवाह झाल्यानंतर प्राप्त होणारा गृहस्थाश्रम या दोन्ही आश्रमांतील आवश्यक नियमांचे पालन करणे त्याच्याकडून अभिप्रेत आहे. विवाह हा जसा नेमक्या कोणत्या वर्षी करावा याचा शास्त्रात स्पष्ट उल्लेख नाही त्याप्रमाणेच ‘समावर्तन‘ कधी करावे याचाही उल्लेख नाही. तथापि सर्वसाधारणपणे उपनयनानंतर १२ वर्षांनी (म्हणजेच २० वर्षाच्या आसपास) सुमुहूर्तावर करण्यास हरकत नसावी.
या संस्कारात खालीलप्रमाणे विधी असतात.
- मुहूर्ताच्या दिवशी आन्हिक आटोपल्यानंतर सकाळी पुण्याहवाचन करुन स्नातकाने स्वत: प्रधानहोम करावा. त्यानंतर न्हाव्याकडून डोक्यावरील शेंडी वगळता, सर्व केस काढून परत स्नान करावे. स्नानानंतर आचमन विधी करुन उपनयनाच्या वेळी घातलेल्या खांद्यावरील एका यज्ञोपवीतात समंत्रक आणखी एकाची भर टाकावी. म्हणजेच आणखी एक यज्ञोपवीत घालावे. त्यानंतर २ नवीन वस्त्रे अंगावर धारण करावीत. उपरोक्त मंत्रानुसार स्नातकाने आपल्या डोळ्यांमधे काजळ घालावे व कानांमधे कुंडले घालावीत. त्यानंतर सर्वांगास सुवासिक अत्तराचे लेपन करावे. स्वत:च्या कपाळी मुंडावळ बांधावी. गळ्यात किमान एखादा सोन्याचा मणी असलेला हार, हातात छत्री व दंड, डोक्यावर पागोटे व पायात चपला घालाव्यात. त्यानंतर देवळात देवदर्शन करुन परत घरी यावे. देवळातून परत आल्यावर हात-पाय धुवून आचमन करावे, समंत्रक, होमामधे सामिधांचे हवन करावे व त्यानंतर होमकार्य पूर्ण करावे. समावर्तन संस्कार झाल्यानंतर विवाह होण्यापूर्वी, उपनयनानंतरच्या वेळेपासून सांप्रत काळापर्यंत, घराण्यातील जवळच्या निवर्तलेल्या व्यक्तींसाठी, प्रातिनिधिक स्वरूपाचे अशौच तीन रात्री पाळावे.
सामग्री यादी : |
|
गणपती | गुळ 100 ग्रॅम |
शंख | नारळ 06 नग |
घंटी | तांदुळ 03 किलो |
हळद 50 ग्रॅम | पत्रावळी 02 नग |
कुंकू 50 ग्रॅम | द्रोण 25 नग |
गुलाल 50 ग्रॅम | पंचे 02 नग |
अभिर 50 ग्रॅम | ब्लाऊज पिस 03 नग |
अष्टगंध 50 ग्रॅम | विविध प्रकारची सुवासीक फुले ½ किलो |
चंदन पावडर 50 ग्रॅम | बेल पत्र 20 पान |
पिवळी मोहरी 10 ग्रॅम | तुळस 01 जुडी |
रांगोळी 250 ग्रॅम | दुर्वा 02 जुडया |
गोमुत्र 01 बाटली | आंब्याचे डहाळे 02 नग |
अत्तर 1 डबी | गजरे 02 नग |
जानवी जोड 05 नग | वेण्या 02 नग |
माचिस 01 नग | विड्याची पाने 40 नग |
कापुर 100 ग्रॅम | फळे 05 नग ( 01 संच ) |
तेल वाती 01 पाकीट | केळी 06 नग |
तुप वाती 01 पाकीट | समिधा 100 नग |
तिळाचे तेल 01 बाटली 500 मिलि | बंब खोड ( इंधन / लाकडे ) 01 किलो |
अगरबत्ती 01 पुडा | गोवर्या ( शेणी ) 05 नग |
मोठ्या सुपार्या 50 नग | काळे तिळ 50 ग्रॅम |
बदाम 05 नग | व्रीही 50 ग्रॅम |
खारिक 05 नग | काळे उडीद 50 ग्रॅम |
अक्रोड 05 नग | गाईचे तुप 500 ग्रॅम |
हळकुंड 05 नग | मध 01 बाटली |
खडीसाखर 100 ग्रॅम | यव ( जव ) 50 ग्रॅम |
सुके खोबरे 02 नग | एक वाटी तांदुळचा शिजवलेला भात |
रेती किंवा माती 01 किलो | निरांजन ( तेलाचे व तुपाचे ) प्रत्येकी 01 नग |
विटा 10 नग | समई 01 नग |
पाट 04 नग | पंचामृत 01 वाटी |
आसने 04 नग | गाईचे शेण 10 ग्रॅम |
ताम्ह्न 03 नग | सुट्टे पैसे 25 नाणी |
तांब्याचे तांबे 03 नग | पातेल 01 नग |
पळी 01 नग | गाईची प्रतिमा ( चांदीची गाय ) |
भांडे ( पंचपात्री ) 01 नग | नैवेद्य पेढे पाव किलो |
स्टिलची ताटे 02 नग |
टिप :-
- नविन कात्री / मिठाईची व्यवस्था यजमानांनी करावी.
- चौरंग, पाट, आसने, ताम्ह्न, तांब्याचे तांबे, पळी, भांडे ( पंचपात्री ), स्टिलची ताटे, वाटी चमचे, पातेल, इत्यादि वस्तूंची व्यवस्था यजमानांना करावी लागेल अन्यथा गुरुजीन कडून भाडे तत्वावर पुरवले जाईल.
- घरातील देव, फोटो, गोडाचा शीरा किवा पेढ़े, समई, निरांजन, तेल, तूप ही व्यवस्था यजमानाने करावी.
- होम विटांवर करायचा असल्यास विटांची आणि रेती किंवा माती व्यवस्था यजमानांना करावी लागेल अन्यथा पॅकेज मध्ये गुरुजीन कडून होमकुंड पुरवले जाईल.
ठिकाण आणि दक्षिणा:
गुरुजी संख्या – 2
ठिकाण | दक्षिणा |
डोंबिवली | 5000/- |
ठाणे ते दादर | 6000/- |
पनवेल | 5000/- |
नवी मुंबई | 6000/- |
वेस्टर्न | 7500/- |
टिटवाळा ते कसारा | 6000/- |
बदलापूर ते कर्जत | 6000/- |
सामग्री (गुरुजींच्या दक्षिणे व्यतिरिक्त) | 2500/- |
पूजा बुक करा
