गणेश होम

वैदिक ग्रंथानुसार महागणपती हवन हा एक शक्तिशाली हवन आहे. जे एखाद्या व्यक्तीला निरोगी, श्रीमंत आणि समृद्ध जीवन प्राप्त करण्यास मदत करते. कोणतेही काम सुरू करण्यापूर्वी गणेशाची पूजा केली जाते. भगवान गणेश ही बुद्धीची (ज्ञान), रिद्धी-सिद्धी (समृद्धी-यशाची) देवता आहे. श्रीगणेशाच्या पूजनाने माणसाच्या जीवनात येणारे कोणतेही अडथळे दूर होतात. प्रत्येक चतुर्थीला सूर्य संक्रांत किंवा सूर्योदयापूर्वी कोणत्याही शुभ दिवशी गणपती हवन केले जाते.

हे हवन एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीतील ग्रहांच्या अशुभ प्रभावांना नियंत्रित करण्यासाठी उपयुक्त ठरते. या हवनामुळे मानवी आरोग्याशी संबंधित समस्या दूर होण्यास मदत होते. श्रीगणेशाच्या कृपेने त्यांच्या भक्तांच्या जीवनातील संपत्तीचे मार्ग खुले होतात. गणपती हवन तुमच्या जीवनातील यशाचा मार्ग मोकळा करतो.

सामग्री यादी :
गणपती खारिक 05 नग
शंख अक्रोड 05 नग
घंटी हळकुंड 05 नग
हळद 50 ग्रॅम खडीसाखर 20 ग्रॅम
कुंकू 50 ग्रॅम सुके खोबरे 03 नग
गुलाल 50 ग्रॅम गुळ 250 ग्रॅम
अभिर 50 ग्रॅम पंचखाद्य 20 ग्रॅम
अष्टगंध 50 ग्रॅम नारळ 04 नग
चंदन पावडर 50 ग्रॅम तांदुळ 04 किलो
पिवळी मोहरी 50 ग्रॅम पत्रावळी 02 नग
शतावरी 50 ग्रॅम द्रोण 25 नग
रांगोळी 250 ग्रॅम पंचे 02 नग
गोमुत्र 01 बाटली धोतर पान 01 नग
सुतगुंडी 01 नग ब्लाऊज पिस 04 नग
पंचरंगी धागा 01 नग विविध प्रकारची सुवासीक फुले ½ किलो
अत्तर 01 बाटली लाल फुले छोटी ½ किलो
जानवी जोड 03 जोड बेल पत्र 20 नग
धुप 50 ग्रॅम तुळस 01 जुडी
माचिस 01 नग दुर्वा 05 जुडी
कापुर 25 ग्रॅम फुलांचे हार 01 नग
तेल वाती 01 नग आंब्याचे डहाळे 03 नग
तुप वाती 01 नग फुलांचे तोरण 01 नग
तिळाचे तेल ½ लिटर गजरे 02 नग
गुलाब पाणी 01 बाटली वेण्या 01 नग
गंगाजळ 01 बाटली विड्याची पाने 40 नग
अगरबत्ती 01 पुडा फळे 10 नग ( 02 संच )
मोठ्या सुपार्‍या 50 नग केळी 06 नग
बदाम 05 नग समिधा 200 नग
बंब खोड ( इंधन / लाकडे ) 03 किलो कर्मानुसार मुख्यदेवता प्रतिमा गणपती
गोवर्‍या ( शेणी ) 15 नग नैवेद्यमोदक
काळे तीळ 50 ग्रॅम चौरंग 02 नग
काळे उडीद 50 ग्रॅम पाट 03 नग
होमपुडा 01 नग आसने 06 नग
लाह्या 50 ग्रॅम ताम्ह्न 03 नग
शहाळ 01 नग तांब्याचे तांबे 03 नग
ऊस 100 ग्रॅम पळी 02 नग
गाईचे तुप 500 ग्रॅम भांडे ( पंचपात्री ) 02 नग
मध 01 बाटली स्टिलची ताटे 02 नग
गव्हाचे पिठ / तांदूळाचे पिठ प्रत्येकी ½ किलो समई 01 नग
दोन वाटी तांदुळचा शिजवलेला भात निरांजन ( तेलाचे व तुपाचे ) प्रत्येकी 01 नग
रेती किंवा माती 01 किलो गोमय ( गाईचे शेण ) 10 ग्रॅम
विटा 04 नग किंवा मोठ होमकुंड सुट्टे पैसे 50 नाणी
पातेल 01 नग नैवेद्य मोदक

टिप :-
  • होम विटांवर करायचा असल्यास विटांची आणि रेती किंवा माती व्यवस्था यजमानांना करावी लागेल अन्यथा पॅकेज मध्ये गुरुजीन कडून होमकुंड पुरवले जाईल.
  • जेवणाच्या नैवेद्याची व्यवस्था यजमानांनी करावी
  • चौरंग, पाट, आसने, ताम्ह्न, तांब्याचे तांबे, पळी, भांडे ( पंचपात्री ), स्टिलची ताटे, वाटी चमचे, पातेल, इत्यादि वस्तूंची व्यवस्था यजमानांना करावी लागेल अन्यथा गुरुजीन कडून भाडे तत्वावर पुरवले जाईल.
  • घरातील देव, फोटो, गोडाचा शीरा किवा पेढ़े, समई, निरांजन, तेल, तूप ही व्यवस्था यजमानाने करावी.
  • 11, 21, 51, 111 मोदक  ही व्यवस्था यजमानाने करावी.
ठिकाण आणि दक्षिणा:
गुरुजी संख्या – 3

ठिकाण दक्षिणा
डोंबिवली 6000/-
ठाणे ते दादर 7500/-
पनवेल 6000/-
नवी मुंबई 6000/-
वेस्टर्न 7500/-
टिटवाळा ते कसारा 7500/-
बदलापूर ते कर्जत 7500/-
सामग्री (गुरुजींच्या दक्षिणे व्यतिरिक्त) 1500/-

पूजा बुक करा