
विवाह संस्कार व देवक ब्राह्मण
लग्नाच्या दिवशी सर्वप्रथम होणारा धार्मिक विधी म्हणजे ‘देवक बसविणे’. वधू आणि वर यांच्याकडे स्वतंत्ररित्या ते बसवले जाते. ‘देवक’ म्हणजे संरक्षण. पुण्याहवाचनाचा विधी करताना वधूपिता, वधूमाता व वधू पूर्वेकडे तोंड करून बसतात. हाच क्रम मुलाकडेही पाळला जातो. यावेळी देश, काल वगैरे उच्चारून मंत्र म्हणतात व त्याचा उद्देश वधूपिता व वरपिता यांचे देवऋण फिटावे, धर्माज्ञेप्रमाणे वधूवरांनी प्रजोत्पादन केल्याने परमेश्वर संतुष्ट व्हावा असा असतो. देवकासाठी एका सुपात दुहेरी धाग्याचे सूत गुंडाळलेला नारळ ठेवतात. कुलदेवतेचे स्मरण करून अविघ्न कलशाची स्थापना करतात. २७ सुपा-यांवर मातृका देवता व आंब्याच्या पानांच्या ६ देवतांनी नन्दिनी आदि देवतांना आवाहन करण्यात येते. लग्नकार्य जिथे होणार तो मंडप संरक्षित व्हावा हा त्यामागचा हेतू आहे. एका समिधेला आंब्याची पाने उलटी बांधतात. २७ देवतांची स्थापना तांदूळ, गहू पसरून केली जाते.हे सूप देवापुढे ठेवले जाते. सुपामध्ये अविघ्न कलश म्हणून मातीचे सुगड वापरण्यात येते.
जीवनातील सोळा प्राथमिक कार्यक्रमांपैकी हिंदू धर्म हा सर्वात महत्त्वाचा ‘विवाह संस्कार‘ आहे. विवाहाचा खरा उद्देश हा आहे की दोन लोक देवाचे आशीर्वाद घेऊन चांगले आणि आनंदी वैवाहिक जीवन जगतात! हे करण्यासाठी, शास्त्रानुसार, विवाह विधी आवश्यक आहेत. विवाह म्हणजे पंचग्रहण, म्हणजे वधूचा हात धरणारी पत्नी म्हणून वधूला स्वीकारणे.
हिंदू धर्मात धर्म (वास्तविकता), काम (इच्छा) आणि मोक्ष (अंतिम मुक्ती) हे चार पुरुष निश्चित केले आहेत. विवाह संस्कारांचा उद्देश मनुष्याचे कार्य पूर्ण करणे आणि नंतर मोक्षप्राप्तीकडे जाणे हा आहे.
सामग्री यादी : |
|
गणपती | गुळ 250 ग्रॅम |
शंख | नारळ 05 नग |
घंटी | तांदुळ 02 किलो |
हळद 50 ग्रॅम | पत्रावळी 05 नग |
कुंकू 50 ग्रॅम | द्रोण 25 नग |
गुलाल 50 ग्रॅम | पंचे 01 नग |
अभिर 50 ग्रॅम | ब्लाऊज पिस 05 नग |
अष्टगंध 50 ग्रॅम | विविध प्रकारची सुवासीक फुले 01 किलो |
चंदन पावडर 50 ग्रॅम | बेल पत्र 10 पान |
रांगोळी 250 ग्रॅम | तुळस 01 जुडी |
सुतगुंडी 02 नग | दुर्वा 02 जुडया |
पंचरंगी धागा 01 नग | आंब्याचे डहाळे 02 नग |
अत्तर 1 डबी | गजरे 05 नग |
जानवी जोड 02 नग | वेण्या 02 नग |
माचिस 01 नग | विड्याची पाने 40 नग |
कापुर 25 ग्रॅम | फळे 05 नग |
तेल वाती 01 पाकीट | केळी 06 नग |
तुप वाती 01 पाकीट | समिधा 100 नग |
तिळाचे तेल 01 बाटली 500 मिलि | बंब खोड ( इंधन / लाकडे ) 01 किलो |
अगरबत्ती 01 पुडा | गोवर्या ( शेणी ) 04 नग |
मोठ्या सुपार्या 20 नग | लाह्या 100 ग्रॅम |
बदाम 10 नग | मध 01 बाटली |
खारिक 10 नग | गाईचे तुप 500 ग्रॅम |
अक्रोड 10 नग | विटा 02 नग |
हळकुंड 10 नग | चौरंग 02 नग |
खडीसाखर 20 ग्रॅम | पाट 08 नग |
सुके खोबरे 02 नग | आसने 02 नग |
ताम्ह्न 03 नग | समई 01 नग |
तांब्याचे तांबे 03 नग | पंचामृत 01 वाटी |
पळी 02 नग | सुट्टे पैसे 25 नाणी |
भांडे ( पंचपात्री ) 02 नग | पातेल 01 नग |
स्टिलची ताटे 02 नग | पेढे / साखर / गुळ |
निरांजन ( तेलाचे व तुपाचे ) प्रत्येकी 01 नग |
टिप :-
- हार / शाल / देवगडू / अंतरपाट / गुच्छ / लामण दिवा / बाशिंग / रोवळी / फुलांची मुंडावळी / अक्षदा / लिंबू 02 / तिळलाडू / सुरी लाहया 200 ग्रॅम / मुंडावळी / मिठाईची व्यवस्था यजमानांनी करावी.
- चौरंग, पाट, आसने, ताम्ह्न, तांब्याचे तांबे, पळी, भांडे ( पंचपात्री ), स्टिलची ताटे, वाटी चमचे, पातेल, इत्यादि वस्तूंची व्यवस्था यजमानांना करावी लागेल अन्यथा गुरुजीन कडून भाडे तत्वावर पुरवले जाईल.
- घरातील देव, फोटो, गोडाचा शीरा किवा पेढ़े, समई, निरांजन, तेल, तूप ही व्यवस्था यजमानाने करावी.
- होम विटांवर करायचा असल्यास विटांची आणि रेती किंवा माती व्यवस्था यजमानांना करावी लागेल अन्यथा पॅकेज मध्ये गुरुजीन कडून होमकुंड पुरवले जाईल.
ठिकाण आणि दक्षिणा:
गुरुजी संख्या – 2
ठिकाण | दक्षिणा |
डोंबिवली | 11000/- |
ठाणे ते दादर | 12500/- |
पनवेल | 12500/- |
नवी मुंबई | 12500/- |
वेस्टर्न | 12500/- |
टिटवाळा ते कसारा | 12500/- |
बदलापूर ते कर्जत | 12500/- |
सामग्री (गुरुजींच्या दक्षिणे व्यतिरिक्त) | 4000/- |
पूजा बुक करा
