
उपनयन संस्कार व देवक
मुंज/उपनयन हा हिंदू धर्मातील सोळा संस्कारापैकी तेरावा संस्कार आहे. हा कुमाराचा एक प्रमुख संस्कार आहे. परंपरेनुसार, हा संस्कार ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्य या तीन वर्णांतील पुरुषांसाठी सांगितला आहे. याला मौंजीबंधन व व्रतबंध अशीही नावे आहेत. ज्या गृह्यसूत्रोक्त कर्माने बाळाला वेदाध्ययनासाठी गुरूजवळ नेले जाते त्याला “उपनयन” असे म्हणतात. या संस्कारानंतर संस्कारित व्यक्ती आपल्या पालकांपासून दूर होऊन स्वतःच्या शिक्षणावर लक्ष केंद्रित करते. या संस्कारात यज्ञोपवीत (जानवे) धारण करणे हा मुख्य विधी असतो.
उपनयन म्हणजे आपला मूळ जो प्रजापति, आत्म्याने त्याच्या जवळ जाणे, त्याची वस्त्रे, त्याची विद्या आपण मिळविण्याचा प्रयत्न करणे, केवळ या प्रमाणावरून पाहता ज्यांना वेदाधिकार पाहिजे असेल त्यांनी हा संस्कार करावयाचा आणि वैदिक व्हावयाचे असा मूळ उद्देश उपनयन संस्कारात दिसतो. सर्व सोळा संस्कारात उपनयनसंस्कार सर्वात श्रेष्ठ होय. हा संस्कार केल्याने बटूला वेदाध्ययनाचा अधिकार प्राप्त होतो. तसेच त्याला वैदिक धर्मात सांगितलेली कर्मे करण्याचाही अधिकार प्राप्त होतो.
विवाह उपनयन इ. संस्कारांच्या आरंभी हे संस्कार निर्विघ्नपणे पूर्ण व्हावे या उद्देशाने मंडपदेवता व अविघ्न गणपती यांची प्रतिष्ठा करण्याची पद्धत आहे यालाच देवक बसविणे असे म्हणतात.
सामग्री यादी : |
|
गणपती | खडीसाखर 20 ग्रॅम |
शंख | सुके खोबरे 02 नग |
घंटी | गुळ 250 ग्रॅम |
हळद 50 ग्रॅम | नारळ 08 नग |
कुंकू 50 ग्रॅम | तांदुळ 03 किलो |
गुलाल 50 ग्रॅम | गहु 01 किलो |
अभिर 50 ग्रॅम | पत्रावळी 05 नग |
अष्टगंध 50 ग्रॅम | द्रोण 25 नग |
चंदन पावडर 50 ग्रॅम | पंचे 03 नग |
पिवळी मोहरी 25 ग्रॅम | धोतर पान 01 नग |
रांगोळी 250 ग्रॅम | ब्लाऊज पिस 05 नग |
गोमूत्र 01 बाटली | विविध प्रकारची सुवासीक फुले 01 किलो |
सुतगुंडी 02 नग | बेल पत्र 10 पान |
पंचरंगी धागा 01 नग | तुळस 01 जुडी |
अत्तर 1 डबी | दुर्वा 02 जुडया |
जानवी जोड 02 नग | फुलांचे हार ( लग्नाचे हार ) 02 नग |
माचिस 01 नग | आंब्याचे डहाळे 03 नग |
कापुर 25 ग्रॅम | फुलांचे तोरण 01 नग |
तेल वाती 01 पाकीट | गजरे 05 नग |
तुप वाती 01 पाकीट | वेण्या 02 नग |
तिळाचे तेल 01 बाटली 500 मिलि | विड्याची पाने 40 नग |
अगरबत्ती 01 पुडा | फळे 05 नग |
मोठ्या सुपार्या 100 नग | केळी 06 नग |
बदाम 10 नग | समिधा 300 नग |
खारिक 10 नग | बंब खोड ( इंधन / लाकडे ) 02 किलो |
अक्रोड 10 नग | गोवर्या ( शेणी ) 07 नग |
हळकुंड 10 नग | काळे तीळ 50 ग्रॅम |
मध 01 बाटली | भांडे ( पंचपात्री ) 02 नग |
गाईचे तुप 500 ग्रॅम | स्टिलची ताटे 02 नग |
सुप 01 नग | निरांजन ( तेलाचे व तुपाचे ) प्रत्येकी 01 नग |
गव्हाचे पिठ ½ किलो | समई 01 नग |
दोन वाटी तांदळाचा शिजवलेला भात | पंचामृत 01 वाटी |
रेती किंवा माती 02 किलो | गाईचे शेण 50 ग्रॅम |
विटा 10 नग | सुट्टे पैसे 25 नाणी |
चौरंग 01 नग | पातेल 01 नग |
पाट 04 नग | गाईची प्रतिमा ( चांदीची गाय ) |
आसने 07 नग | पेढे पाव किलो |
ताम्ह्न 03 नग | पळी 02 नग |
तांब्याचे तांबे 03 नग |
टिप :-
- उपनयन हार 02 / शाल / देवगडू / नविन कात्री / अंतरपाट / गुच्छ 02 / लामण दिवा / रोवळी / रांजण / अक्षदा / नविन कात्री / पंचा / लंगोटी / सोवळे किंवा सोवळ्याची चड्डी / पळस दंड / अष्टवर्ग / भिक्षावळी / फुलांची मुंडावळी / तिळलाडू / मुंडावळी / मिठाईची व्यवस्था यजमानांनी करावी.
- जेवणाच्या नैवेद्याची व्यवस्था यजमानांनी करावी.
- चौरंग, पाट, आसने, ताम्ह्न, तांब्याचे तांबे, पळी, भांडे ( पंचपात्री ), स्टिलची ताटे, वाटी चमचे, पातेल, इत्यादि वस्तूंची व्यवस्था यजमानांना करावी लागेल अन्यथा गुरुजीन कडून भाडे तत्वावर पुरवले जाईल.
- घरातील देव, फोटो, गोडाचा शीरा किवा पेढ़े, समई, निरांजन, तेल, तूप ही व्यवस्था यजमानाने करावी.
- होम विटांवर करायचा असल्यास विटांची आणि रेती किंवा माती व्यवस्था यजमानांना करावी लागेल अन्यथा पॅकेज मध्ये गुरुजीन कडून होमकुंड पुरवले जाईल.
ठिकाण आणि दक्षिणा:
गुरुजी संख्या – 2
ठिकाण | दक्षिणा |
डोंबिवली | 7500/- |
ठाणे ते दादर | 9000/- |
पनवेल | 7500/- |
नवी मुंबई | 7500/- |
वेस्टर्न | 9000/- |
टिटवाळा ते कसारा | 7500/- |
बदलापूर ते कर्जत | 7500/- |
सामग्री (गुरुजींच्या दक्षिणे व्यतिरिक्त) | 4000/- |
पूजा बुक करा
