खंडोबा नवरात्रि पूजन

खंडोबा म्हणजे महाराष्ट्राचे कुलदैवत, यांचा निवास आहे महाराष्ट्रातील जेजुरी गडावर. या खंडोबाच्या हातात खांडा नावाची तलवार होती म्हणूनच त्यांचे नाव पडले खंडेराया किंवा खंडोबा. खंडोबा म्हणजे शिवाचा अवतार आणि अशा या खंडोबाचा उत्सव म्हणजेच खंडोबाचं नवरात्र आणि चंपाषष्ठी जस देवीच नवरात्र असत तसच खंडोबाच असत पण ते षडरात्र म्हणजे सहा दिवस व रात्र असतं तर असे हे मल्हारी नवरात्र मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या दिवशी सुरु होते. मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासुन ते शुध्द षष्ठीपर्यंत हे चंपाषष्ठीचे सहा दिवसांचे नवरात्र असते.षष्ठी म्हणजे सहा असा हा सहा दिवसांचा उत्सव जेजुरीला मोठ्या प्रमाणात व अतिशय भक्तिभावाने साजरा होतो. जेजुरी प्रमाणेच खंडोबाच्या इतर देवळातही हा उत्सव साजरा केला जातो. मार्तंड भैरवाने आणि मल्ल या दैत्यांचा संहार केला आणि भूतलावरील मोठे अरिष्ट टळले. त्याच्याच विजयोत्सवात देवगणांनी मार्तंड भैरवावर भंडाऱ्या बरोबरच चंपाषष्ठी म्हणजेच चाफ्याच्या फुलांची वृष्टी केली म्हणुनच मार्गशीर्ष शुध्द षष्ठीला चंपाषष्ठी हे नाव मिळाले आणि या उत्सवाची सुरुवात झाली. 

खंडोबाचा वार रविवार म्हणून शक्यतो त्याच दिवशी हे कुलाचार करतात कुलाचाराप्रमाणे पूजेत सुघट व टाक असतात. आता हा खंडोबाचा टाक कसा असतो तर यात घोडा आणि खंडोबा असतो या टाकाची स्थापना नवरात्रात केली जाते. नवरात्रप्रमाणेच माळा वाढवत घटावर फुलांच्या माळा लावल्या जातात. नवरात्राचे पाच दिवस उपवास करून सहाव्या दिवशी तो सोडतात. देवाला बेल, दवणा, चाफ्याची आणि झेंडूची फुले वाहिली जातात. सहा दिवस नंदादीप लावतात. खंडोबा नवरात्र करण्याची पध्दत कोणाकडे टाक असतो तो बसवला जातो, कोणाकडे खंडोबाची मूर्ती असते, कोणाकडे कलश असतो कलशावर ताम्हण ठेवून त्यात तांदूळ पसरतात व त्यावर खंडेरायाची मूर्ती स्थापना केली जाते. कोणाकडे माळाबंधन असते म्हणजे काय तर विडयाच्या पानांच्या किंवा झेंडूच्या माळा सोडल्या जातात. काही जणांकडे उपवास केले जातात. जागरण गोंधळ असतो, तळी आरती सुध्दा असते.

प्रथम देवघरातील सर्व देवांची पंचामृताचा म्हणजेच (साखर, दही, दूध, तूप, मध) या मिश्रणाचा अभिषेक करून पूजा करून घ्यावी. त्यानंतर कलश, घंटा, गणपती, शंख, यांची पूजा करावी. प्रथम हळदीकुंकू वाहून मग फुले वहावीत. कलशात सुपारी फूल अक्षता वहाव्यात आणि मग त्यात विड्याची पाने ठेवावीत. नारळाला हळदी कुंकू वाहून तो कलशावर ठेवावा. कलशाखाली अक्षता ठेवून मग त्यावर कलश ठेवावा. त्यानंतर गणपतीची पूजा करावी यासाठी गणपती ताम्हनात घ्यावा. हळदकुंकू अक्षता वाहून दुधाचा अभिषेक करावा, नंतर पाणी घालून पुसून घ्यावा. मग गणपती जागेवर ठेवून हळदीकुंकू, फुले ववाहीत नंतर खंडोबाचा टाक ताम्हनात घ्यावा दुध व पाण्याचा अभिषेक करून पुसून घ्यावा नंतर एक विड्याचे पान घेऊन त्यावर स्वस्तिक काढावे आणि त्यावर तो टाक ठेवावा. हळदीकुंकू वहावे. हळद जास्त वहावी कारण खंडोबाला हळद जास्त प्रिय आहे. पिवळे फूल वहावे.नंदादीप लावावा, तो सहा दिवस ठेवावा आणि तळी आरती करावी. 

ताम्हनामध्ये विड्याची किंवा नागिणीची पाने, सुपारी, खोबऱ्याचे तुकडे, भंडारा म्हणजेच हळदेची पूड हे साहित्य घेऊन तीन, पाच, सात अशा विषम संख्येमध्ये पुरुष मंडळीनी एकत्र येऊन “सदानंदाचा येळकोट किंवा येळकोट येळकोट जय मल्हार” असे मोठ्याने तीन वेळा म्हणत ताम्हण उचलावे. 

 त्यानंतर पानाचा विडा ठेवून म्हणतात (काही घरांमध्ये डोक्यावरील टोपी, रुमाल भुवा वस्त्र जमिनीवर ठेवतात) त्यावर ताम्हण ठेवतात. एक विडा देवासमोर मांडला जातो तळी उचलणाऱ्या प्रत्येका पुढे एक एक विडा ठेवाला जातो.  देवाला भंडार वाहून प्रत्येकाच्या कपाळी भंडारा हा लावतात. त्यानंतर पुन्हा एकदा सदानंदाचा येळकोट च्या गजरात ताम्हण उचलले जाते आणि शेवटी तळीचे ताम्हण मस्तकी लावले जाते नंतर बुधली आणि दिवटी घेऊन आरती करतात. देवाकडे तोंड करून भंडारा व खोबरे उधळून प्रसाद वाटला जातो.

सामग्री यादी :
गणपती हळकुंड 05 नग
शंख खडीसाखर 20 ग्रॅम
घंटी सुके खोबरे 02 नग
हळद 25 ग्रॅम गुळ 250 ग्रॅम
कुंकू 25 ग्रॅम पंचखाद्य 50 ग्रॅम
गुलाल 25 ग्रॅम नारळ 04 नग
अभिर 25 ग्रॅम तांदुळ 02 किलो
अष्टगंध 25 ग्रॅम टोपली 01 नग
चंदन पावडर 25 ग्रॅम पत्रावळी 01 नग
रांगोळी 250 ग्रॅम सप्तधान्य ( तुर, मुग, चणा, वाटाणा, मसुर, उडीद, ज्वारी, ) एकत्र 100 ग्रॅम
गोमुत्र 01 बाटली लाल माती किंवा काली माती 01 किलो
सुतगुंडी 01 नग मातीचा किंवा तांब्याचा कलश 01 नग
पंचरंगी धागा 01 नग द्रोण 25 नग
अत्तर 01 बाटली पंचे 01 नग
जानवी जोड 02 जोड ब्लाऊज पिस 02 नग
धुप 50 ग्रॅम विविध प्रकारची सुवासीक फुले ½ किलो
माचिस 01 नग झेंडूची फुले 01 किलो
कापुर 20 ग्रॅम बेल पत्र 20 नग
तेल वाती 01 नग तुळस 01 जुडी
तुप वाती 01 नग दुर्वा 02 जुडी
तिळाचे तेल ½ लिटर फुलांचे हार 01 नग
गुलाब पाणी 01 बाटली आंब्याचे डहाळे 02 नग
गंगाजळ 01 बाटली गजरे 02 नग
अगरबत्ती 01 पुडा वेण्या 01 नग
मोठ्या सुपार्‍या 20 नग विड्याची पाने 40 नग
बदाम 05 नग फळे 05 नग ( 01 संच )
खारिक 05 नग केळी 06 नग
अक्रोड 05 नग गाईचे तुप 100 ग्रॅम
मध 01 बाटली भांडे ( पंचपात्री ) 01 नग
चौरंग 01 नग स्टिलची ताटे 02 नग
पाट 01 नग समई 01 नग
आसने 03 नग निरांजन ( तेलाचे व तुपाचे ) प्रत्येकी 01 नग
ताम्ह्न 03 नग पंचामृत 01 वाटी
तांब्याचे तांबे 02 नग नैवेद्य पेढे पाव किलो
पळी 01 नग

टिप :-
  • चौरंग, पाट, आसने, ताम्ह्न, तांब्याचे तांबे, पळी, भांडे ( पंचपात्री ), स्टिलची ताटे, वाटी चमचे, पातेल, इत्यादि वस्तूंची व्यवस्था यजमानांना करावी लागेल अन्यथा गुरुजीन कडून भाडे तत्वावर पुरवले जाईल.
  • घरातील देव, फोटो, गोडाचा शीरा किवा पेढ़े, समई, निरांजन, तेल, तूप ही व्यवस्था यजमानाने करावी.
ठिकाण आणि दक्षिणा:
गुरुजी संख्या – 1

ठिकाण दक्षिणा
डोंबिवली 2100/-
ठाणे ते दादर 2500/-
पनवेल 2100/-
नवी मुंबई 2100/-
वेस्टर्न 2500/-
टिटवाळा ते कसारा 2500/-
बदलापूर ते कर्जत 2500/-
सामग्री (गुरुजींच्या दक्षिणे व्यतिरिक्त) 600/-

पूजा बुक करा