भक्तांनी गणेश मूर्ति स्थापन करण्या आधी काही महत्वाच्या सूचना की जेणेकरून ऑन लाइन मूर्ति स्थापना करताना आपणास काही अडचणी येणार नाही.
पुर्व तयारी
- एका ताटामध्ये १० विड्याची पाने त्यावर पैसा , सुपारी, हळद,कुंकू, बदाम, खारीक, आक्रोड ठेवून असे पाच विडे तयार करावे.
- ५ फळ घेऊन ५ विड्यांच्या पानावर वेग वेगळे ठेवावे.
- २ विड्यांवरती २ नारळ ठेवावे.
- समई मध्ये वाती लावून तिळाचे तेल घालून जिथे देवाची मखर केली असेल त्या ठिकाणी दोन्ही बाजूस ठेवावे.
- निरांजन मध्ये फुलवाती ठेवून तूप घालून देवाच्या मखर जवळ ठेवावे.
- एका तांब्याच्या तांब्यात अर्धा तांब्या पाणी भरून त्यामध्ये पैसा, सुपारी, दूर्वा, फुलघालून एक आंब्याचा डहाळा ठेवून एक नारळ(शेंडी वर करून)कलशावर ठेवावा व त्या कलशावर गंधाचे स्वस्तिक काढून तयार ठेवणे.
- एका ताम्हणात तांदूळ ठेवावे.
- एका ताटात फुल,दूर्वा, बेल, तुळस तसेच गणपति मूर्तीसाठी आणलेली दुर्वांची कंठी, हार ठेवावा.
- गणपतीला जे अलंकार घालणार आहे ते एका ताटात काढून ठेवावेत.
- अर्धा वाटी पंचामृत किवा दूध, दही, तूप, मध, साखर असे वेगवेगळे तयार करून ठेवणे.
- माचिस,कापुर, देवाचे वस्त्र(उपरणे),ब्लाऊज पीसएका ताटात ठेवणे.
- जिथे गणपती मूर्ति स्थापन करणार आहे त्या ठिकाणी अर्थात मखर भोवती रंगोळी काढून ठेवणे.
- प्रसाद मोडक किवा पेढे हे पूजेच्या ठिकाणी ठेवणे.
- एका ताम्हणात किवा ताटात आरती साथी निरांजन व कापुर आरती साथी अजून एक निरांजन करून ठेवणे.
ही सर्व तयारी व्यवस्थित करून ठेवणे जेणेकरून आपल्या गणपति बाप्पाची स्थापना शास्त्रोक्त पद्धतीने यथासांग व्यवस्थित होईल.
मूर्ती स्थापना कृती (मराठी)
- सर्व प्रथम जिथे आपण मूर्ती स्थापना करणार आहोत. त्यावर आपल्या तयारीतल उपरणे (वस्त्र) व्यवस्थित घालणे. त्यावर तांदळाच्या राशिने स्वस्तिक तयार करणे व स्वस्तिकावर थोडे हळद, कुंकू वाहणे.
- गणपतीची मूर्ती त्या स्वस्तिकावर व्यवस्थित ठेवणे.
- गणपतीच्या शेजारी म्हणजे उजव्या बाजूस जे ताम्हण तांदळाचे केले आहे ते ठेवणे व जो कलश आपण तयार केलेला आहे तो त्या ताम्हणात मधोमध ठेवणे.
- गणपतीच्या मूर्ती जवळ जे ५ विडे तयार केले आहेत, उदारणार्थ : पैसा, सुपारी, बदाम, खारीक, अक्रोड हे विडे ठेवावेत. विडा ठेवताना विड्याचा देठ देवाकडे असला पाहिजे.
- ५ फळं त्या विड्यांवर ठेवणे.
- गणपतीच्या पुढे घरातील गणपतीची मूर्ती किंवा सुपारी,थोडे तांदूळ (आसन म्हणून) घालून त्यावर ठेवणे.
- शंख गणपतीच्या डाव्या बाजूस व घंटा गणपतीच्या उजव्या बाजूस ठेवणे.
- आपण आसन घेऊन देवाच्या समोर बसणे.
- आपल्या पुढे १ तांब्या पाणी भरून, ताम्हण, पळी भांड ठेवणे. पळी भांड आपल्या डाव्या बाजूस ठेवणे.
- आपल्या उजव्या बाजूस जे हळद, कुंकू चे ताट तयार केलेले आहे ते तसेच फुलांचे ताट ठेवणे.
- आपल्या डाव्या बाजूस अलंकाराचे ताट तसेच नैवेद्याचे ताट ठेवणे.
- आपल्या पळी भांड्याच्या शेजारी पंचामृत ठेवणे.
- सर्व प्रथम देवाजवळ समई, निरांजन लावणे. सुवासिक अगरबत्ती लावणे व पूजेला सुरवात करावी.
टिप :-
- ऑनलाईन गणेश पूजेसाठी दक्षिणेचे बंधन नाही.
- गणेशोस्तव असल्याकारणाने गणेश मूर्ती स्थापनेसाठी सर्व गुरुजींची बुकिंग पूर्ण झालेली आहे. त्यामुळे नवीन गुरुजींची बुकिंग बंद आहे.
- परंतु आम्ही आपल्यासाठी ऑनलाईन पद्धतीने गणेश मूर्ती स्थापना पूजा मराठी व हिंदी भाषेत गणेश चतुर्थीला घेऊन येत आहोत.
- कोणत्याही प्रकारचे रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. 19 सप्टेंबर रोजी सकाळी 4.00, 6.00, 8.00, 10.00 व दुपारी 12.00 वाजता आमचे गुरुजी आमच्या ALL IN ONE GURUJI च्या यूट्यूब चॅनल मधून लाईव्ह येऊन आपला सर्वांकडून गणेश पूजा करवून घेतील.
- आमच्या खालील यूट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा. आम्ही लाईव्ह आल्यावर आपल्यास त्याचे notification मिळेल.
लाईव्ह गणेशमूर्ती स्थापना आणि प्राणप्रतिष्ठा मराठी
